धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे आयोजित बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी जळकोट च्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आरविंद लोखंडे यांची तर उपाध्यक्ष पदी रमेश लोखंडे यांची निवड करण्यात आली.
येथिलं युगपुरुष तरुण मंडळ व डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समिती जळकोट च्या संयुक्त विद्यमाने महामानव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने जेष्ठ कार्यकर्त अभिमन्यू लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीची प्रस्तावाना सतिश माने केली. प्रारंभी २०२४ च्या जंयतीचा लेखा जोखा हिशोब प्रदिप लोखंडे यांनी समस्त
समाजबांधवा समोर
मांडला.त्यानंतर एक मत्तानी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जंयत्ती उत्सव कमिटी अध्यक्ष पदी अरविंद लोखंडे यांची तर उपाध्यक्षपदी रमेश लोखंडे यांची व सचिव पदी सुनिल माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उरवरित कार्य कारणी पुढील प्रमाणे सल्लागार प्रकाश लोखंडे, शिवाजी लोखंडे, मिरवणूक प्रमुख अरुण लोखंडे,सतिश माने, प्रदिप लोखंडे, महिला प्रतिनिधी ज्योती लोखंडे, नगीना लोखंडे, कांचन लोखंडे, साधना लोखंडे, कोमल माने, सोनल भालेराव,गोकर्णा लोखंडे,जया माने, हिराबाई लोखंडे, वैजयंता माने जिजाबाई लोखंडे, लता माने आदींची निवड करण्यात आली.सदर निवडीस सर्वांनी टाळया वाजवून अनुमोदन दिले . सदर बैठकी मध्ये १४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळच्या वत्तीने राबविण्याचा संकल्प नुतन कार्यकारणीने केला असून २६ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे.
या वेळी बाबूराव माने,तुकाराम लोखंडे,लक्ष्मण लोखंडे,युवराज लोखंडे लहू लोखंडे,शुभम पासोडे, सागर लोखंडे, मुंकूद लोखंडे, उमेश लोखंडे, सनी गायकवाड, गंगाधर लोखंडे, दिनकर कांबळे, संजय गायकवाड,अजय लोखंडे,सायबा लोखंडे,ओम भालेराव, सुमंत लोखंडे,रोहीत माने,कविता लोखंडे, वर्षा गायवाड जयश्री लोखंडे, राणी बनसोडे,बबिता लोखंडे लक्ष्मी लोखंडे सरीता लोखंडे,सह भिमनगर मधील बौद्ध उपासक उपासीका मोठया संख्येने उपस्थित होते