spot_img
23.1 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

येणेगूर येथे ईद उत्साहात साजरी सामाजिक एकता, अखंडतेसाठी प्रार्थना केले.

 

येणेगूर / प्रतिनिधी :-

उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त नमाज पठण उत्साहात साजरा व मानव जातीला सुख समाधान शांती मिळावी मानव जातीत एकमेकांत बंधूभाव, समता, स्वातंत्र्य, समान न्याय मिळण्या साठी मुस्लिम बांधवांच्या वतीने येथील असलेल्या ईदगाह मैदानावर रमजान ईद निमित्ताने सोमवारी विशेष नमाज (प्रार्थना) करण्यात आली. या वेळी मुस्लिम जमात कमिटीचे सदर मोहदिन मटके,मोलाना जाकीर मुन्शी,मोलाना सलीम मकानदार,आदींनी प्रार्थना घेतली. विश्वात असणा-या तमाम मानव जातीला निरोगी, धनसंपन्न जीवन प्राप्त व्हावे, सर्वांना सुखी जीवन प्राप्त व्हावे.जे आजारी आहेत ते लवकर आजारातून बरे व्हावे मानव जातीच्या कल्याणा करिता अल्लाह कडे प्रार्थना करण्यात आली.मान्यवरांकडून शुभेच्छा रमजान ईद निमित्त गावातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी,येणेगूर ग्रामपंचायत माजी उपसरपंच विजयानंद सोनकटाळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप बिराजदार, प्रवीण कागे,शिक्षक सौरभ उटगे,येणेगूर पोलीस पाटील शिवदर्शन पाटील, पत्रकार संभाजी पाटील, पो.कॉ.मारुती मडोळे,संतोष बिराजदार, शेषेराव पाटील, सुरज बोडके,आदीच्या उपस्थितीत यांच्या हस्ते आईस्क्रीम व गुलाबपुष्प देवुन यांच्या वतीने ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.  आदींनी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या