spot_img
22.3 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

वागदरी येथे एकाच रात्री तिन घरात चोरी, नागरिकात घबराट : अंदाजे तिन लाख रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला

वागदरी / प्रतिनिधी  (एस.के. गायकवाड ):-
तुळजापूर तालूक्यातील वागदरी येथे चोरट्यांचा सुळसुळाट उठला असून दि.३० व ३१ मार्च २o२५ च्य मध्य रात्री येथील तिन घरावर चोरट्याने डल्ला मारून अंदाजे तिन लाख रुपयाचा
(3o,oooo/-रु)
मुद्दे माल लंपास केला आहे.
या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीती असी की
दि.३o मार्च रोजी गुडी पाडव्याच्या दिनी रात्रीच्या सुमारास पूरणपोळी सह गोड धोड खावून गाढ झोपेत गाव असताना दि.३१ मार्चच्या मध्यरात्री चोरट्याने शरद धरम पवार यांच्या घरात प्रवेश करणाऱ्या जिन्याद्वारे घरात प्रवेश केला. घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. घराचे आतील दरवाजे सर्व उघडेच होते. चोर पावलाने चोरटे घरातील कपाट ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी गेले.पोट माळ्यावर ठेवलेली कपाटाची चावी चोरटयाच्या हाती लागली असता चोरट्यानी कपाट उघडून दिड तोळ्याचे सोन्याचे दागीने, देवकार्यासाठी ठेवलेले १६ooo/- रुपये रोख रक्कम,१३ooo/- रु. किमतीचा हँड्रॉईड मोबाईले, ६००० /- रुपयाची साडी, ७०००/ रु. किंमतीचे चांदीचे दागीने अरो अंदाजे एक लाख सत्याऐेंशी रुपये (१,८७,ooo/- ) चा मुद मुद्देमाल चोरटयाने हाडप केला तर येथील भरत राम माडजे यांच्या घराता बाहेरून कुलूप असल्याचे चोरटयाना दिसले. घरात कोणी नाही याचा फायदा घेत त्यानी घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात घुसले व कपाटात ठेवलेले १o,ooo/- रुपये रोख, अर्धा तोळ्याचे सोन्याचे दागीने १४ooo/- रुपयाचे चांदीचे दागीन असे एकून ६४,ooo /- रुपयाचा मुद्दे माल घेवून घरातील सामान अस्थाव्यास्थ टाकून निघून गेले.तसेच शरद पवार यांच्या जिन्याचा अधार घेत येथील रामचंद्र यादव यांच्या जिन्यावरून त्यांच्या वरच्या मजल्यावर जावून एका खोलीत चोरटे घूसले .तेथून ही यादव यांचा १८,ooo/- रुपये किमिंतीचा मोबाईल,१४,ooo/- किमिंतीचा शालू व ५००० रुपये रोख रक्कम असे एकून ३७,ooo / चा मुद्दे माल चोरट्याने लंपास केला.असा प्रकारे वागदरी येथे तिन घरे फोडूनअंदाजे एकून २,८८,ooo रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने हडप करून निघून गेले.काही किंमती वस्तूही चोरट्याने चोरल्या आहेत असे एकून अंदजे तिन लाख रुपयाचा मुद्देमाल चोरट्यानी हडप केला असून सदर घटनेमुळे येथील ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्मान झाले असून नळदुर्ग पोलीसा समोर हे एक मोठे आव्हान उभे राहीले आहे. त्यामुळे नळदुर्ग पोलीसानी रात्रीच्या वेळेची गस्त वागदरी पर्यंत वाढवावी असी मागणी ग्रामस्थातून होत आहे. यापूर्वी ही वागदरी शिवारातून रास करून ठेवलेले सोयाबिन, दावनीला बांधलेले गायी,म्हैसी चोरट्याने चोरून घेवून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.या सर्वं बाबीचा विचार करून ग्रा.प.ने गावात मुख्या चौकात सीसी टिव्ही कॅमेरे बसवावेतअसी मागणीही येथील ग्रामस्थातून होत आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या