spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

श्री कुलस्वामिनी आश्रमशाळा जळकोट येथे ग्रंथाची गुढी उभारून शोभा यात्रेस सुरवात…

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर :विजय पिसे जळकोट

 

श्री कुलस्वामिनी प्राथमिक,माध्यमिक आश्रमशाळा जळकोट व राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र शुद्ध प्रतिपदा मराठी नववर्ष दिनानिमित्त प्रथमतः ग्रंथाची गुढी उभारून प्राचार्य संतोष चव्हाण साहेब यांच्या हस्ते ग्रंथाची पुजा करण्यात आली.यावेळी *प्राचार्य संतोष चव्हाण साहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.. आज आपणही दीन, हीन बनलो असून वाईट प्रवृतींशी लढण्यासाठी म्हणून गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतीज्ञा करायची. भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळविण्याची प्रतिज्ञा करायची. आपल्या मनातील चंचल, स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत, स्थिर व सात्विक बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. हाच खरा विजय आणि तेव्हाच गुढी उभारणे हे खऱ्या अर्थाने होईल विजयपताका उभारण्यासारखे* *गुढी पाडवा…प्रवेश वाढवा व शोभा यात्रेस सुरवात करण्यात आले.*
शोभा यात्रेचे सुरवात केदारलिंग मंदिरापासून करण्यात आले होते..ठिकठिकाणी शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले. शोभा यात्रेत विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाचे नृत्य मोठ्या उत्साहात भारदार असा खेळ चौका चौकात सादर करण्यात आले. कुमारी मयुरी कांबळे व श्रीमती अश्विनी लबडे यांनी लेझीम खेळाच्या विद्यार्थीनीची पुर्ण तयारी करुन घेतली. केदारलिंग यात्रा कमिटीच्या वतीने विद्यार्थ्यांना बिस्कीट व केळी देण्यात आले.व संभाजीनगर येथे शोभा यात्रेचे समारोप करण्यात आले.यावेळी इंदिरा गांधी आदर्श आश्रम शाळा होर्टी मुख्याध्यापक विनायक राठोड ,प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती आशा पवार , नागेंद्र गुरव,खंडेराव कारले,अप्पासाहेब साबळे,देवानंद पांढरे,किरण कांबळे,श्रीमती प्रमिला कुचंगे,शांताबाई चौगुले,कल्पना लवंद उपस्थित होते हे शोभा यात्रा यशस्वी करण्यासाठी बिळेणसिध्द हक्के,बाळासाहेब मुखम,संतोष दुधभाते,दुर्गेश कदम,बालाजी राठोड अमित खारे,सागर चव्हाण आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर परिश्रम घेतले..

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या