spot_img
17.1 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

बाभळगाव येथील विविध क्षेत्रातील आकरा गुणवंतांचा ग्रामस्थांच्या वतीने १० एप्रिल रोजी सन्मान सोहळा

अणदूर / प्रतिनिधी :-

तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स मंडळी,विधीज्ञ, देशसेवा व पोलीस खाते अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव व सन्मान सोहळा बाभळगाव ग्रामस्थांच्या वतीने दिनांक १० एप्रिल रोजी संपन्न होणार आहे

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी हे आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतिश हरिदास, सेवानिवृत्त तहसिलदार चंद्रकांत शिंदे,लातुर येथील युवा सिंगर विजेता महाराष्ट्र राज्य शिवशाहीर संतोष साळुंके, सोलापूर येथील अपोलो फर्टीलिटीच्या सचिवा डॉ किर्ती कटारे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव जेष्ठ साहित्यिक व कवी प्रा डॉ अरविंद हंगरगेकर, सरपंच सुरेखाताई कांबळे, उपसरपंच पल्लवी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
यावेळी सेवानिवृत्ती निमित्त प्रा देवदत्त आनंदराव पाटील, दत्तात्रय भिमराव कांबळे,राम मुकुंदा चव्हाण, ज्ञानेश्वर भिमराव महाबोले यांचा तर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले डॉ विष्णु विठ्ठल सातपुते, डॉ अभिषेक देवदत्त पाटील, डॉ अभिनंदन दयानंद काळुंके, डॉ प्राजक्ता गोविंदराव पाटील यांचा, भारत सरकार नोटरी प्राप्त विधिज्ञ ॲड किशोर नरहरी पाटील,उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल अविनाश नागनाथ धरणे,तर पोलीस खात्यात कार्यरत असलेले अक्षय प्रभाकर जाधव या गुणवंताचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असुन याचे सर्व नियोजन बाभळगाव ग्रामस्थांनी केले असल्याचे बाभळगाव गौरव सन्मान सोहळा समितीचे अध्यक्ष संभाजीराजे पाटील सदस्य डॉ संतोष पवार यांनी कळविले आहे

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या