धाराशिव न्यूज रिपोर्टर :- विजय पिसे जळकोट
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा धाराशिव तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म जयंती निमित्त जाहीर व्याख्यान व 17 कर्तुत्वान महिलांचा सन्मान सोहळा आज रोजी धाराशिव येथे उत्साहात संपन्न झाला .
महाराष्ट्र राज्य सरकारचे माजी राज्यमंत्री, तुळजापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा राणा दादा पाटील साहेब ,श्री .नितीन काळे मा . भाजपा जिल्हाध्यक्ष,श्री युवराज नळे ,शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष श्री . मधुकर उन्हाळे, श्रीम. दिपाली दत्तात्रय कुलकर्णी, श्रीम.अंजली नितीन काळे,श्रीमती दैवशाला हाके, प्रांत कार्याध्यक्ष श्री .मच्छिंद्र गुरमे व महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ . पल्लवी किशोर पिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . ॲड मीराताई कुलकर्णी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान दिले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी धाराशिव जिल्हा शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अनमोल प्रयत्न केले .प्रांत सहकार्यवाह श्री . किशोर पिसे, .जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले .जिल्हा कार्यवाह राजाभाऊ हुकिरे . सुरेश राऊत .विशाल जाधव .सतीश कानडे .शेषराव चव्हाण .शिवाजी चव्हाण.सतीश जाधवर .सुनील सूर्यवंशी .वसंत पाटील .गौरीशंकर कलशेट्टी .पांडुरंग गड्डीमे .दत्तात्रय दंडगुले .दयानंद पवार . श्रीमती ज्योती साकोळे .श्रीमती प्रमिला वाघे . श्रीम.राजश्री जानराव . आदिनी परिश्रम घेतले.