spot_img
3.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

साने गुरुजी कथामालेचे ५७ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन २२व २३ मार्च व राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

सोलापूर  / प्रतिनिधी – ( सुनील पुजारी)

 

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई कडून
स्व.आप्पासाहेब गुंडोजी पाटील व स्व.सुमन आप्पासाहेब पाटील स्मृतीप्रीत्यार्थ ग्रंथमित्र श्री गुलाबराव आप्पासाहेब पाटील पुरस्कृत राष्ट्रीय बाल सेवा पुरस्कार श्री.कांतराव विठ्ठलराव गाजरे माजलगाव स्वरुप ११हजार रुपये रोख ,सन्मानचिन्ह ,सन्मानपञ,शाल,श्रीफळ,पुस्तक,,उषाताई मोहाडीक उत्कृष्ट शाखा पुरस्कार प्राचार्य ,उमाबाई श्राविका विघालय व कनिष्ठ महाविघाल सोलापूर स्वरुप ५०००रुपये रोख ,सन्मान चिन्ह,सन्मानपञ,शाल,श्रीफळ,पुस्तक ,राष्ट्रीय उत्कृट कथानिवेदक पुरस्कार श्रीमती अपर्णा निरगुडे स्वरुप ५०००रुपये रोख,सन्मान चिन्ह ,सन्मान पञ ,शाल,श्रीफळ,पुस्तक,
स्वातंञ्यसेनानी प्रकाशभाई मोहाडीकर राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार सौ.लता जयेंद्र सोमवंशी -कदम मुख्याध्यापिका पार्वती कन्या प्रशाला जळकोट,श्री.चंद्रकांत प्रल्हादराव गठडे पर्यवेक्षक श्री ज्ञानेश्वर विघालय व कनिष्ठ महाविघालय तुरोरी,श्री.बाबाजी पोपट हिलाळ उपशिक्षक जि.प.प्राथमिक शाळा फाकटे पुणे ,श्री.विकास सिताराम कानडे पदवीधर शिक्षक जि.प. आदर्श प्राथमिक शाळा चांडोली ब्रुंद्रक पुणे ,श्री. रविंद्र तानाजी वाजगे जि.प.प्राथमिक शाळा पाबळवाडी सावरव पुणे सत्काराचे स्वरुप ५००रुपये रोख,सन्मान चिन्ह ,सन्मान पञ,शाल ,श्रीफळ ,पुस्तक असे असणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष शामराव कराळे, हे आहेत. प्रमुख अतिथी लालासाहेब पाटील ,सुनील पुजारी,हसनभाई देसाई,प्रा.अशोक म्हमाणे ,पांडूरंग नाडकर्णी , आहेत. अ.भा. साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय प्रमुख कार्यवाह सुनील पुजारी सेवानिवृत्त झाल्याप्रीत्यार्थ विशेष सत्कार होणार आहे. हसनभाई देसाई पुरस्कार मिळालेले आहे .विशेष सत्कार होत आहे. ग्रंथमिञ प्राचार्य डाँ.गजानन कोठेवार अध्यक्षपदी निवड झाल्याने विशेष संत्कार केले जाणार आहे. दिनांक २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता दसरा चौक कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे तरी साने गुरुजी प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीस प्रमुख कार्यवाह सुनील पुजारी यांनी कथामालेकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या