spot_img
22.3 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

स्वच्छ प्रशासकीय अधिकारी म्हणून पोपटराव पाटील यांचा पुरस्कार देऊन सत्कार

 

चिवरी / प्रतिनिधी –

 

महाराष्ट्र पोलीस टाईम्स आणि साप्ताहिक धनगर शक्ती न्युज चा ४ था वर्धापन दिन व महाराष्ट्र पोलीस टाईम्स च्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन धाराशिव येथे नुकतेच करण्यात आले, सदरील कार्यक्रमात, विविध क्षेत्रातील मान्यवराचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
धाराशिव येथील महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक उमेश काळे यांच्या हस्ते, स्वच्छ प्रशासकीय अधिकारी म्हणून पोपटराव दत्तात्रय पाटील आरटीओ(चिवरी) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेश काळे हे होते. प्रमुख पाहुणे धाराशिव उपविभागीय पोलीस ठाण्यात स्वप्निल राठोड यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले यावेळी स्वप्निल राठोड, शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शकील शेख बेंबळी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सरकारी वकील अमोल सिद्ध कोरे , कृषिभूषण दीपक घोडके(अणदूर),पत्रकार राजेंद्र स्वामी(अणदूर) , ग्रामसेवक नेताजी दबडे, अनिल हजारे कळंब तालुका, याचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी सरकारी कामगार कल्याण अधिकारी धाराशिव सुधाकर कोनाळे यांनाही सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप नाना मगर यांनी केले, प्रास्ताविक आर एस गायकवाड यांनी केले.तर आभार डॉ झाकिर शेख यांनी मानले.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या