spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

समाजावर किर्तनाचा प्रभाव न पडता परिणाम झाला पाहिजे – ह.भ.प किसन महाराज जगताप वलांडीकर…..

उमरगा /प्रतिनिधी :-

उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथे श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव निमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील सहाव्या दिवशी मंगळवारी (दि. 18)रोजी ह भ प किसन महाराज जगताप वलांडीकर किर्तन सेवेत बोलत होते.
आज-काल किर्तने प्रभावी होत आहेत.पण परिणामी होताना दिसत नाही कारण समाज किर्तन ऐकून आचरण करायला पाहिजे, म्हणून आजही समाज भरकटत आहे.समाजावर प्रभाव पडण्यासाठी तुकोबारायासारखे अधिकारी संत महात्मेच लागतात..
“सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला” या अभंगावर कीर्तन करताना ह. प. किसन महाराज जगताप वलांडीकर यांनी सांगितले…
मनुष्य जन्म हा वाया घालवण्याचा अधिकार कोणालाच नसून तो सार्थकी लागावा यासाठी नामस्मरण ही साधना सर्वांनी केली पाहिजे, प्रपंचाची उठा ठेव करण्याच्या नादात भक्ती पासून दूर जाऊ नका.आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरू नका. भक्ती करण्यासाठी भगवंताविषयी एक निष्ठावंत भावच असला पाहिजे असे महाराज म्हणाले..
युवकांनी परमार्थ करायला पाहिजे, मुखात विठ्ठलाचे नाव पाहिजे, आपण कुठे का असेना विठ्ठलाचे भजन करावे असे जगताप महाराज सांगितले.
यावेळी व्यासपीठाधिकारी शिवहार मुळे महाराज , नवनाथ शिंदे महाराज , गुलाब पांचाळ महाराज , चंद्रकांत हेंडले,माऊली महाराज तोरंबा,गोविंद कदम, सनातन भालकडे, सागर पांचाळ, विलास हेंडले, मोहन गुरव, सुग्रीव रणखांब, हरी गुरुजी जेवळी, आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील व परिसरातील तोरंबा,करवंजी, जेवळी, हिप्परगा , भजनी मंडळ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या