धाराशिव ( प्रतिनिधी ) –
बीड आणि लातूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आला आहे. अशातच धाराशीवमध्ये प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यात एका १८ वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड, काठी तसंच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली. मारहाणीत तो मृत झाला असं समजून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं होतं. या तरुणावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते .आज सकाळी ११ वाजता त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाभ्रुड येथील माऊली बाबासाहेब गिरी असे अमानुष मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माऊलीचा त्यास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता.