धाराशिव / प्रतिनिधी :-
धाराशिव येथील बालकल्याण समितीच्या सदस्या,तथा जिल्हा न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ ॲड दिपाली शिवाजीराव जहागिरदार यांची भारत सरकारचे नोटरी म्हणून निवड झाली आहे
त्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या समीतीवर कार्यरत असुन लोक आदालतच्या माध्यमातून अनेक प्रकरणे निकाली काढण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे,विधिज्ञ म्हणून काम करीत करीत त्या अधिवक्ता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून विशेष कार्य करीत आहेत
त्यांची नोटरीपदी निवड झाल्याने
बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने, सदस्या ॲड सुजाता माळी, ॲड मैना भोसले, सदस्य दयानंद काळुंके, महेश मेंढेकर, राजेंद्र जाधव, बाळासाहेब कदम, प्रशांत मते,संदिप चवले, रविंद्र चव्हाण, गणेश पवार, गणेश गायकवाड, राजेंद्र मोरे, माधुरी हरवले सरस्वती अडसुळ, यांनी त्यांचे अभिनंदन केले
- Advertisement -