उमरगा /प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथे श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात बुधवार दि. 13 मार्चपासून दि. 21 मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे, या कालावधीत दररोज काकड आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण वाचन, गाथा भजन, प्रवचन, नामजप, हरिपाठ, चक्रीभजन,हरी किर्तन, हरी जागर, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 62 वर्षापासून चालू आहे.
या सप्ताह सोहळ्यात विविध, प्रवचनकार व कीर्तनकार येणार आहेत, दि. 13 रोजी ह.भ.प बालाजी मक्तेदार महाराज यांचे प्रवचन तर ह.भ.प वैभव महाराज चिकुंद्रा यांची कीर्तन सेवा, दि. 14 रोजी ह.भ.प अनाप्पा बिराजदार महाराज यांचे प्रवचन तर ह.भ.प प्रल्हाद सरडे महाराज यांची कीर्तन सेवा, दि. 15 रोजी ह.भ.प बाबुराव पाटील महाराज यांचे प्रवचन तर ह. भ.प देविदास महाराज नितलिकर यांची किर्तन सेवा , दि.16 रोजी दुपारी बारा वाजता ,श्री संत तुकाराम महाराज बीज गुलाल उत्सव व ह.भ.प , परमेश्वर लामजने महाराज यांचे प्रवचन तर ह .भ.प संतोष पवार महाराज बारामगाव यांची कीर्तन सेवा, दि.17 रोजी ह.भ.प बाबुराव पाटील महाराज पडोळी यांचे प्रवचन तर ह भ प गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज माकणीकर यांची कीर्तन सेवा ,दि.18रोजी ह.भ .प किसन जगताप महाराज वलंडी यांचे प्रवचन व कीर्तन सेवा ,दि.19 रोजी ह.भ .प शेखर सगर महाराज करवंजी यांचे प्रवचन तर ह.भ .प तुकाराम हजारे महाराज कोल्हापूर यांची कीर्तन सेवा, दि. 20रोजी, श्री एकनाथ षष्ठी गुलाल व ह.भ .प सुरेश पाटील महाराज यांचे प्रवचन तर ह भ प गुरुवर्य विठ्ठल महाराज दिंडेगावकर यांची कीर्तन सेवा,दि.21रोजी,सकाळी पसायदान, तसेच दुपारी गावातुन पालखी, ग्रंथ दिंडी मिरवणूक,सायंकाळी पाच वाजता ह.भ .प गुरुवर्य विठ्ठल महाराज दिंडेगावकर यांचे काल्याचे किर्तन . तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. 16मार्च रोजी श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सवात दुपारी बारा वाजता गुलाल व फुल उत्सवात दरवर्षी बिजे निमित्त भाविकांची गर्दी असते, तरी परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मारुती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत हेंडले, सचिव रमेश लामाजने, महालिंग बिराजदार, शिवहार मुळे, गुलाब पांचाळ, काशिनाथ करके,नवनाथ शिंदे,मोहन गुरव यांच्यासह भजनी मंडळ तसेच सुपतगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.