spot_img
4.9 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

पत्रकारांना नोटीस पाठविणाऱ्या पवन ऊर्जा कंपनीवर कारवाईसाठी पत्रकार आक्रमक

 

मे. रिन्यू एनर्जी ग्रीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात संताप

धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) –

एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परस्परच कुठलीही परवानगी न घेता शेतकऱ्याच्या पिकांची करून जमीन खोदून पवन चक्कीसाठी आवश्यक असलेले सिमेंट काँक्रीटचे फाउंडेशन तयार केले. त्यामुळे त्या शेतकऱ्याने संबंधित कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्या संदर्भातील बातमी पत्रकारांनी केली. त्यामुळे कंपनीचे पितळ उघडे पडल्यामुळे ती बातमी आमच्या कंपनीच्या विरोधात का केली ? असा कांगावा करीत अब्रू नसलेल्या कंपनीने उलटपक्षी चक्क दोन पत्रकारांनाच कायदेशीर नोटीसा बजावत त्यांच्यावर प्रत्येकी दहा कोटी असा वीस कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. त्यामुळे संबंधित कंपनीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे दि.१३ मार्च रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मे. रिन्यू एनर्जी ग्रीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पवन ऊर्जा कंपनीच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील शेतकरी खेलो बाबुराव सोनटक्के यांची शेत जमीन गट नंबर २८६ क्षेत्र ०१ हेक्टर व त्यांच्या पत्नीच्या नावे ६० आर क्षेत्र आहे. या शेत जमिनीवर सोनटक्के कुटुंबाची कसलीही संमती न घेता मे. रिन्यू एनर्जी ग्रीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अतिक्रमण करून पूर्ण क्षेत्र खोदून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याची चौकशी करण्यासाठी सोनटक्के गेल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी वरील कंपनीच्या विरोधात जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे तक्रार करून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी दि.२५ फेब्रुवारी रोजी केली होती. याबाबतची बातमी तेरणेचा छावा व उस्मानाबाद न्यूज पोर्टल या चॅनलवर प्रसारित करण्यात आली होती. ती बातमी कंपनीच्या विरोधात का केली ? असा जावई शोध लावत तेरणेचा छावाचे संपादक पांडुरंग अंगद मते व उस्मानाबाद न्यूज पोर्टलचे संपादक सलीम गफार पठाण यांना पवन ऊर्जा कंपनीमार्फत ॲड सारंग एस. एस वडगांवकर यांनी नोटीसा पाठविल्या आहेत. तसेच कंपनीची अब्रू गेली असा उल्लेख करीत पत्रकारावरच प्रत्येकी दहा कोटी असावीस कोटीचा दावा ठोकला आहे. त्यामुळे अशा मुजोर कंपनी विरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. यावर ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, कालिदास म्हेत्रे, मच्छिंद्र कदम, जी बी राजपूत, प्रशांत कावरे, मल्लिकार्जुन सोनवणे, पांडुरंग मते, सलीम पठाण, आकाश नरोटे, जुबेर शेख, मुस्तफा पठाण, किरण कांबळे, असिफ मुलाणी, विशाल जगदाळे, प्रशांत मते, किशोर माळी, जफरोदिन शेख, कुंदन शिंदे, काकासाहेब कांबळे, शहबाज शेख, अल्ताफ शेख, शितल वाघमारे, सतीश मातने, कलीम शेख, आयुब शेख, कैलास चौधरी, अमजद सय्यद आदींसह पत्रकारांच्या सह्या आहेत.

………

संबंधित कंपनी विरोधात योग्य ती कारवाई करण्यासाठी हे प्रकरण जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीमध्ये मांडले जाईल. या बैठकीस कंपनी प्रतिनिधी सोबतच पत्रकारांना देखील बोलावून सहभागी करण्यात येईल. विशेष म्हणजे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या कोणत्याही कंपनीची गाय केली जाणार नसून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात केली जाईल. त्यामुळे कुठल्याही कंपनीच्या नोटीस किंवा धमकीला पत्रकारांनी अजिबात घाबरु नये. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन पत्रकारांच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळास दिला.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या