तुळजापूर / प्रतिनिधी :-
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुळजापूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित महाआरोग्य शिबीरात 250 रुग्णांची विविध तपासण्या मोफत करण्यात आले आहेत.
कै. डॉ. सुजित अरूणराव मगर यांच्या स्मरणार्थ व जागतिक महिला दिनानिमीत्त शिबिराचे आयोजित आले होते, यावेळी रुग्णांची अस्तिरोग,त्वचारोग, दंतरोग,सोनोग्राफी,नाक,कान,घसा,रक्त,लघवी, एक्सरे आदी मोफत तपासणी करून देण्यात आली. अशी माहिती डॉ. मोनल मगर यांनी दिली.
या शिबिरात डॉ. कृष्णा स्वामी,डॉ. आकाश भाकरे, डॉ. प्रविण कुदळे,डॉ.मोनल सुजित मगर, डॉ. प्रिया राजेश पाटील,डॉ. नेहा कदम-पाटील, डॉ.बालाजी समुद्रे, डॉ. राजेश पाटील, डॉ.व्यंकटेश पोलावार, डॉ. प्रशांत मोटे,रत्नदीप जाधव आदी डॉक्टरांनी उपस्थित राहून आरोग्यसेवा दिली.या महाआरोग्य शिबिरात तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी लाभ घेतला.