धाराशिव न्यूज रिपोर्टर :- विजय पिसे जळकोट
पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगर पालिका या भागात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर कौशल्य प्रशिक्षणाचा वाहता झरा असून नावाजलेली संस्था व संस्थेतील विध्यार्थ्यांना सोबत घेऊन विविध कलागुणाचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये रॅम्प वॉक,सोलर प्रशिक्षण, समर्पक रंगीबेरंगी रांगोळी, इलेक्ट्रिकल प्रोजेक्टचे प्रदर्शन, फॅशन शो घेऊन त्यांचा क्रमांक काढून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मानवी जीवनाला बदलत्या काळात आपण स्वतः बदलवून नवा इतिहास कसा घडवायचा आणि आजरामर कसा करायचा याचा अनुभव आणि बोध घेण्यात आला. या मौलिक कार्याचा आणि विचाराचा वारसा याच संस्थेतील माजी विद्यार्थी चालवतात ही विशेष बाब आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विविध क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन ही संस्था मोलाची भूमिका बजावत आहे. या काळात अशा शिक्षणाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन तरुणांना काम कसे मिळेल हे धोरण लक्षात घेऊन कार्य करत आहे. लाखो विद्यार्थी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग घेऊन आपलं जीवन अधिक सोयीस्कर करून घेत आहेत.
जागतिक महिला दिनानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत केले. या कार्यक्रमात सूत्रसंचालन कु. शब्दाली मुळगावकर आणि श्री. सुनिल गुडदे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचं अध्यक्ष पद श्रीम. स्नेहल शेट्टी (प्रोजेक्ट हेड) प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ.मुक्ता खासणीस (सी एस आर हेड) सौ.सुगंधा टेकाळे (अकाउटंट हेड) सौ.सिमा जाधव श्री.विशाल रेंगाडे, (आयटीआय मोरवाडी) प्रा.मनीषा निंबाळकर,प्रा.रचना पाटील(रामकृष्ण मोरे महाविद्यालय पिंपरी चिंचवड पुणे) श्री.विष्णू माळी,कैलास राणे,प्रशांत जयस्वाल कु.निवेदिता विटकर,सौ रूपाली बरड,वर्षा वाघमारे,काजल दाखले, ओंकार दिकोंडा,कृष्णा वडमारे, प्राजक्ता कुंभार, गौरी नलवडे, कु.सृष्टी महाजन,आकाश शर्मा (सेवक) इत्यादी उपस्थित होते.
या संस्थेचे दहावे पुष्प गुंफताना सर्व मान्यवरांनी आपापले मोलाचे मनोगत मांडून उपस्थितांचे मने जिंकले. यावेळी आभार सौ.वैशाली मरगळे यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.