spot_img
5.3 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

हंगरगा नळ तांड्याचा विभक्त ग्राप चा प्रस्ताव सादर तांडा समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा – प्रविण पवार

 

धाराशिव ( सतीश राठोड ) :-

धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश बंजारा तांडा वस्तीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत होत आहेत अनेक तांडे ग्रामपंचायत विभक्त नसल्याने तांड्याचा विकास म्हणाव तसं होत नाही शासकीय योजना तांड्यापर्यत पोहचत नाही यासाठी जिल्ह्यातील बंजारा बांधवांनी आपापल्या तांड्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विभक्त ग्रामपंचायतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून तांडा समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवीण पवार यांनी केले .
तुळजापूर पंचायत समिती कार्यालयात शासनाच्या श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे विभागीय अशासकीय सदस्य प्रवीण पवार व जिल्हा कमिटीचे अशासकीय सदस्य प्राचार्य संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस एडवोकेट दीपक आलुरे व तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना प्रविण पवार बोलत होते . यावेळी तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या इंदिरानगर तांड्याचा झपाट्याने सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून इंदिरा नगर तांड्याचा विभक्त ग्रामपंचायतीचा प्रस्ताव तुळजापूरचे गटविकास अधिकारी ताकभाते यांना देण्यात आले. यावेळी श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे तालुकास्तरीय कमिटीचे सदस्य मोहन चव्हाण बोलताना म्हणाले की ,हंगरगा नळ ग्रामपंचायतीची स्थापना 1965 साली झाली . शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येते गावचा विकास झाला परंतु इंदिरानगर बंजारा तांड्याचा म्हणावं तसं विकास झाला नाही असा आरोप करीत गाव पुढाऱ्यावर सडकून टीका केली. तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून इंदिरानगर तांड्याचा विभक्त ग्रामपंचायतीची स्थापना करणार व तांड्याचा विकास करणार असल्याचे शेवटी बोलताना केले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या