5.5 C
New York
Thursday, March 13, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

अर्थसंकल्प : महायुती सरकारचा अर्थसंकल्प राज्याला सर्वांगाने लाभदायी असाच आहे. जिल्ह्यातील चालू प्रकल्पांना निधी कमी पडणार नाही. – आ. राणाजगजितसिंह पाटील

 

महायुती सरकारचा २०२५ चा अर्थसंकल्प आर्थिक शिस्त पाळत सर्वच घटकांचा विचार करून मांडलेला अर्थसंकल्प असून शेतकरी, महिला, वृद्ध, तरुण, प्रत्येक समाज, राज्यातील प्रत्येक भागाला न्याय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. व्यवसायपूरक वातावरण निर्माण करून उद्योगांना चालना देणे आणि रोजगार निर्मिती करणे,शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापर आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबतच आवास योजनेसाठी ५० हजार रुपये अतिरिक्त राज्य सरकार देणार आहे. यामुळे महाराष्ट्राला संतुलित करणारा हा अर्थसंकल्प आहे.

राज्यातील अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी नाबार्डच्या अर्थसहाय्यातुन निधी उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सिंचनासाठी महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या उर्वरित कामांना आता निधीची कमतरता भासणार नाही असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

महायुती सरकारचा पुढील वर्षभराचा अर्थसंकल्प अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सादर केला. त्यानंतर आमदार पाटील यांनी मराठवाडा आणि जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा अर्थसंकल्प मोठा लाभदायक असल्याचे नमूद करीत गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीडसाठी ३७ हजार ६६८ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळी भूभागला नवसंजीवनी मिळणार असून दुष्काळमुक्तीच्या दिशेने आपल्या महायुती सरकारने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्क एमआयडीसीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसीत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी २३ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरीता “महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन” ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कौडगाव येथील नियोजित टेक्निकल टेक्सटाईल पार्कला अधिकची गती मिळेल. आणि दहा हजार रोजगार निर्मितीची क्षमता असलेला हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – २ अंतर्गत सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने या योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आणखी २४ लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्टही आपल्या महायुती सरकारने आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आता एक “उमेद मॉल” उभारण्यात येणार असल्याने राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे. तसेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेकरीता एकूण ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून १ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ३ हजार ५८२ गावे, १४ हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडली जाणार आहेत.

महायुती सरकारने जाहीर केलेल्या पर्यटन धोरणानुसार १० वर्षात पर्यटन क्षेत्रात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात आपण पर्यटन वृद्धी आणि रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने जे महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत त्याला आवश्यक निधी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने याला आता मोठी बळकटी मिळणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या