spot_img
9.7 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

संभाजीनगर जळकोट जि.प.शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात

 

जळकोट प्रतिनिधी – (विजय पिसे)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर जळकोट येथे ‘सुरसंगम’ वार्षिक स्नेहसंमेलन 2025 हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. मुलांच्या कलाविष्काराला वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर जळकोट येथे सुरसंगम वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक भाऊ पाटील (माजी सरपंच जळकोट ) हे होते. या कार्यक्रमाचं शानदार उद्घाटन जिल्हा परिषद धाराशिवचे माजी सदस्य गणेश दादा सोनटक्के यांच्या शुभहस्ते झाले. तर प्रतिमा पूजन जळकोट नगरीचे सरपंच गजेंद्रनाना पाटील यांच्या शुभहस्ते तर दिपप्रज्वलन प्रशांतभाऊ नवगिरे उपसरपंच जळकोट v स्टेजपूजन मल्लिकार्जुन कुंभार (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती संभाजीनगर ) व शकीलभाई मुलाणी (उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती संभाजीनगर ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून तंटामुक्त समिती जळकोटचे अध्यक्ष यशवंत कदम, विविध कार्यकारी सोसायटी जळकोटचे चेअरमन विकास चुंगे, शिवसेना तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, पार्वती कन्या शाळेचे अध्यक्ष महेश बाप्पा कदम, प्रयाग मल्टीस्टेटचे चेअरमन सचिन कदम हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नागनाथ जटे विस्तार अधिकारी बीट जळकोट, हरिदास महाबोले केंद्रप्रमुख होर्टी, अनिलकुमार करदुरे केंद्रप्रमुख बोरगाव, इंगोले रेणुका माजी सभापती तुळजापूर, जयश्री बसवराज भोगे,अंकुश मल्हारी लोखंडे, संजय अंगुले, संजय माने, गिरीश नवगिरे, शिक्षकनेते डी. डी.कदम, सरिता कदम, तसेच मेघराज किलजे, सतीश पिसे, विजय पिसे,संजय पिसे, संजय रेणुके, सुनील माळगे, अरुण लोखंडे, मंगेश सुरवसे या पत्रकार बंधूंची ही विशेष उपस्थिती याप्रसंगी होती. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर करून सर्व गावकऱ्यांची आणि उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांसाठी बहारदार स्वागत नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर देशभक्तीपर गीत, नाटक, उखाणे, लावण्या, कव्वाली, थोर महापुरुषावरील नृत्य, विनोदी बातम्या व अनेक मराठी,हिंदी गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. गोंधळ गीत,शिवप्रताप थीम डान्स, वासुदेव गीत,दिंडी नृत्य,भीमगीत, मराठी तडका डान्स, राष्ट्रीय एकात्मता मुकनाट्य, पुष्पा, विनोदी नाटिका, खंडोबा गीत, ओ मेरे पापा, उधळ उधळ हो,फिर भी दिल है हिंदुस्थानी या नृत्यांना पालकांनी भरभरून दाद देत चिमुकल्यांचे कौतुक केले. तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिला भगिनींसाठी बाई पण भारी देवा हे नृत्य सादर करण्यात आले. या नृत्याला महिला भगिनींनी टाळ्याच्या गजरात दाद दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका महामुनी एम बी, रेणुके एम एस, इटकरी एन एन,अभिवंत एस जी, वनवे डी एस, मुरमुरे गजानन, चव्हाण एम एम, कुडकले डी एम,आहेरकर एम आर, श्रीकांत कदम, आकांक्षा लोखंडे, प्रताप बेडगे, परमेश्वर मडोळे, मंगेश सुरवसे, नागराज पोतदार, मोहन डांबरे, नागेश स्वामी, सौदागर पवार, रमाकांत सोनटक्के, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, छत्रपती संभाजीनगर गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलकंठ इटकरी सर व धनराज कुडकले यांनी केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील पालक आणि कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या