अणदूर प्रतिनिधी –
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा २०२५ चा जिल्हा स्तरीय आदर्श नारी जीवन गौरव पुरस्कार भातागळी ता लोहारा येथील पण सध्या वास्तव्यास नळदुर्ग कारखाना येथे असलेल्या सुलक्षणा प्रविण आनंदगावकर यांना प्रदान करण्यात आला आहे
सुलक्षणा आनंदगावकर या आपल्या पतीच्या निधनानंतर खचून न जाता हिमतीने आणि जिद्दीने आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिल्या त्यांचा मुलगा मुंबई येथे एम बी बी एस झाला तर मुलगी पुणे येथे बि ए एम एस चे शिक्षण पुर्ण केले असुन दोन मुलांना डॉक्टर करणा-या या सावित्रीच्या लेक ही आजच्या बालकांना आदर्शवत असल्याने तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना २०२५ चा जिल्हा स्तरीय आदर्श नारी पुरस्कार जाहीर केला होता
त्याचा वितरण सोहळा नळदुर्ग येथील आपलं घर बालगृह येथे संपन्न झाला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजवादी नेते भाई पन्नालाल सुराणा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला बालविकास अधिकारी किशोरजी गोरे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने, जिल्हा परिविक्षा अधिकारी व्यंकट देवकर,बालकल्याण समितीच्या सदस्या ॲड मैना भोसले,ॲड सुजाता माळी, ॲड दिपाली जहागिरदार,केशेगाव येथील उद्योजीका अंबिका गावडे,बाल न्याय मंडळाचे सदस्य प्रा डॉ अश्रुबा कदम, सरपंच मल्लीनाथ गावडे,मंगरुळचे पोलीस पाटील लक्ष्मण माळी,कुंभारीचे पोलीस पाटील विठ्ठल वडणे , चाॅंदसाहेब शेख , विलास वकील, नागनाथ जळकोटे यांची उपस्थिती होती,याच दरम्यान अणदूर येथील स्वरलता कराओके क्लबच्या वतीने चंद्रकांत गुड्ड, सचिन ढेपे,रेखा सोनटक्के,सरीता ढेपे यांनी अनाथ मुलांच्या मनोरंजनासाठी संगीत मैफिलीचा कार्यक्रम करुन कार्यक्रमात श्रोत्यांचे लक्ष्य वेधून घेतले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दयानंद काळुंके यांनी, सुत्रसंचलन डॉ संतोष पवार यांनी केले तर आभार प्रबोध कांबळे यांनी मानले
यासाठी मारुती बनसोडे, माणिक निर्मळे,अनिता काळुंके,अनुसया कांबळे, संगीता क्षीरसागर, सचिन तोग्गी, शिवशंकर तिरगुळे,संजिव आलूरे,संदिप चवले यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता