धाराशिव ( सतीश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातीलआलियाबाद येथील भीमाशंकर गणपती राठोड यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
दिनेश राठोड हे गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्येची सोडवणूक करीत असत. गावच्या सार्वजनिक विकास प्रक्रियेत त्यांचा नेहमीच सहभाग असतो . त्यांच्या एकंदरीत कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी भीमाशंकर राठोड यांची निवड केली आहे सदर निवड राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश दत्ता बंडगर यानी एका नियुक्तीपत्राद्वारे केली आहे . त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुखदेव भालेकर , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष दीपक जाधव , धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष सुनील नकाते व इम्तियाज बागवान , जिल्हा संघटक पोपट पुरी , भाजपाचे तालुका सरचिटणीस तथा तांडा समृद्धी योजना धाराशिवचे अशासकीय सदस्य विलास राठोड, तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य प्राचार्य संतोष चव्हाण , तांडा समृद्धी योजना तालुकास्तरीय कमिटीचे वसंत पवार , दामाजी राठोड , ग्रामपंचायत सदस्य मनोज चव्हाण , श्रीमंत राठोड , हरिदास राठोड , अंकुश जाधव सह राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन अध्यक्ष भीमाशंकर उर्फ दिनेश राठोड यांना अभिनंदन केले .