spot_img
9.7 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान, संचलित एकलव्य विद्या संकुलात विज्ञान प्रयोग प्रदर्शन व विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण

 

तुळजापूर प्रतिनिधी :-

तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ-यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित एकलव्य विद्या संकुलातील विज्ञान प्रयोग प्रदर्शनाचे उद्घघाटन व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी-विद्यार्थींना पारितोषिकाचा वितरण सोहळा तुळजापूर येथील पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या हस्ते संपन्न झाला.

प्रारंभी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे गणेश पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विज्ञान विभाग प्रमुख दयानंद भडंगे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेविषयी माहिती देताना सांगितले की, एका गावातून दुसऱ्या गावात भटकंती करणाऱ्या भटके विमुक्त व प्रजातीच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना शिक्षण, स्वावलंबन, सन्मान, सुरक्षा पोहोचायला हवी या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून या संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे सांगून संस्थेच्या माध्यमातून वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये इयत्ता चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी, आठवी ते नववी या तीन गटातील विद्यार्थी विद्यार्थिनीचा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणेश पुजारी पत्रकार उमाजी गायकवाड,सोमनाथ पुजारी यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले.

या सत्कार सोहळ्यानंतर विज्ञान प्रयोग प्रदर्शनाचे उद्घघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सहशिक्षक कोंडीबा देवकर व अनिल घुगे यांनी संस्थेची माहिती देताना यमगरवडीतील भटक्या-विमुक्तांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, वसतिगृह, मुलींसाठी स्वतंत्र वस्तीग्रह, क्रिडांगण,प्रयोगशाळा,किचन रुम, क्रिडा प्रकारात विद्यार्थ्यांनी मिळविलेले प्राविण्य,कर्मचारी निवासस्थान,विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेतली जाणारी काळजी, तसेच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण प्रकल्प सुरू असल्याचे सांगून सध्या 476 विद्यार्थी – विद्यार्थ्यांनी या संस्थेत शिक्षण घेत असल्याचे सांगितले.

एकलव्य विद्या संकुलचे कार्य उल्लेखनीय
-गणेश पुजारी
समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या एकलव्य विद्या संकुलामार्फत करण्यात येत असून संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक वातावरण, सोयी-सुविधा, विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असल्याचे मत पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थींनी आदिती शहाजी पाटील व अस्मिता भोजने यांनी केले तर आभार विज्ञान विभाग प्रमुख बालाजी क्षिरसागर यांनी मानले.

यावेळी पुजारी नगर फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी पत्रकार उमाजी गायकवाड,सोमनाथ पुजारी मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर,विठ्ठल म्हेत्रे, निर्मला हुग्गे,संतोष बनसोडे,अनिल घुगे,खंडू काळे दत्ता भोजने,कोंडीबा देवकर, प्रणिता शेटकार, सविता गोरे किरण चव्हाण हरीश मगदूम दयानंद भडंगे,बालाजी शिरसागर, संगीता पाचंगे आदींसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या