spot_img
9.7 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

छावा चित्रपट पाहण्यासाठी खुदावाडीत भरगच्च गर्दी….!

 

शिवजन्मोत्सव समितीचा पुढाकार

—————–
अणदूर / प्रतिनिधी : –

खुदावाडी ता तुळजापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित छावा चित्रपट स्क्रीनिंगद्वारे दाखविण्यात आला असून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी भरगच्च गर्दी केली होती
खुदावाडीत शिव जयंती निमित्त छावा चित्रपट खुदावाडी गावात प्रदर्शित केला. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या शौर्याने प्रेरित होऊन त्यांचे कार्य समाजात पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. चित्रपटाचे प्रदर्शन सायंकाळी साडेसात वाजता सुरू झाले. गावातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दर्शविला. कार्यक्रमात डिजिटल स्क्रीन आणि साऊंड सिस्टिमच्या सहाय्याने अत्यंत प्रभावीपणे नियोजन करण्यात आले होते. ज्यामुळे उपस्थितांना एक अनोखा अनुभव मिळाला.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून चित्रपट प्रदर्शित करण्यात आले .यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने पत्रकार अजय आणदुरकर, सतिश राठोड, सचिन तोग्गी , दयानंद काळुंके , प्रेस फोटोग्राफर शिवा खुने यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आयोजित कार्यक्रमात नळदुर्ग येथील नगरसेवक विनायक अहंकारी यानी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाजसेवक डॉक्टर सिद्रामप्पा खजुरे , उपसरपंच शरद नरवडे , विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अमोल नरवडे , माजी पंचायत समिती सदस्य महादेव सालगे , माजी सरपंच गुरुनाथ कबाडे , माजी उपसरपंच बापू बोंगरगे , भीमाशंकर कबाडे ,विश्व हिंदू परिषदेचे नागनाथ बोंगरगे, डॉक्टर मनोज कबाडे ,माजी चेअरमन तुकाराम बोंगरगे, पोलीस पाटील बसवेश्वर सांगवे, ग्रामपंचायत सदस्य पंडित कबाडे सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती . गावातील शिवभक्ताने एकत्रित येऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट चित्रफीतीवर दाखवण्यात आल्याने ग्रामस्थ महिला युवकांनी कौतुक केले तर शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठी गर्दी देखील केली होती .

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या