अणदुर / प्रतिनिधी :-
सराटी ता तुळजापूर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु शिवराम बुवा महाराज दिंडेगावकर, गुरुवर्य हभप ज्ञानेश्वर महाराज दिंडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात सुरू आहे.
दिनांक २ मार्च ते ८ मार्च या कालावधीत प्रवचनकार हभप बलभीम जाधव,हभप अशोक जाधव,हभप रामचंद्र कुंभार,हभप जोडभावे सर,हभप विष्णुपंत मुंढे,अविनाश पाटील, हभप संजय जाधव यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून, किर्तनकार हभप राजदीप आंधळे महाराज,हभप प्रसाद काष्टे, हभप नितीन जगताप,हभप श्रीराम चवले,हभप देविदास हौळ, हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर दिंडेगावकर महाराज यांच्या किर्तनाचा भव्य असा कार्यक्रम होणार आहे,तर ८ मार्च रोजी हभप वैभव महाराज कानेगांव यांच्या काल्याच्या किर्तनाने व हभप ज्ञानेश्वर महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते पसायदान व काला वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी इटकळ, बाभळगाव,सराटी, धनगरवाडी,फुलवाडी,शिरगापुर,काळेगाव, सुलतानपूर,आरळी,नांदुरी,कसई,वागदरी,गुळहळ्ळी,चव्हाणवाडी,मंगरुळ, खानापूर, चिंचोली,केऊर, आरबळी,ताड हिप्परगा,दिंडेगाव,काटगाव,येवती,खुदावाडी,फुलवाडी,अणदूर इत्यादी गावातील भजनी मंडळी हरिजागरासाठी उपस्थित राहणार आहेत.
यासाठी विनायक यादव भरगंडे,मोहन गोरख घोडके,ब्रह्मानंद भीमराव कुंभार,बसवेश्वर जगन्नाथ मुळे,कल्लाप्पा सिद्धाप्पा जेवळे,मकरंजन मल्लिकार्जुन पाटील,राजेंद्र इराप्पा हिंगमिरे,मल्लिनाथ राम चिकणे,बाबुराव साताप्पा व्हंड्रे, मल्लिकार्जुन श्रीमंत कुंभार यांच्यासह समस्थ सराटी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
- Advertisement -