उद्या पासून महिलांचे तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण
तुळजापूर / प्रतिनिधी :-
तिर्थ क्षेत्र आई तुळजाभवानीच्या पावन पवित्र नगरीत यात्रा मैदानासाठी आरक्षित सात एकर जागा. असून १९८९ साली शासनाने ही जागा यात्रा मैदानासाठी राखीव ठेवली,१२ लाख मंजूर केले,३.४८ लाख भरपाई दिली. पण पुढे काय?
सत्तेच्या खुर्चीवर बसताच ठराव बदलला, फेरफार गायब झाले आणि डुप्लिकेट पीआर कार्ड तयार करून काही प्लॉट विक्री केली आहे. असे दि.२ मार्च रोजी महिलांनी कमान वेस तुळजापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.
पुढे बोलताना म्हणाल्या कि,शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडपण्याचा मास्टर प्लॅन राबवला असा आरोप केला परिणामी, सात एकर जागेपैकी फक्त तीन एकर मोकळी जागा आहे, बाकीच्या जागेवर उभ्या आहेत बिल्डिंग (इमारती ) मोठ्या प्रमाणावर !
हे सर्व बघून कमानवेस येथील असंख्य महिलांनी चिडून रस्त्यावर उतरल्या आता मात्र आज पासून दि.३ मार्च रोजी असंख्य महिलांचे आमरण उपोषण. महिला चिडून प्रशासन बहिरे झाले की काय? असे म्हणत उपोषणाचा पावित्रा घेतला.
कमानवेस येथील महिलांनी त्यांना यात्रा मैदानच्या जमिनीवर महाराष्ट्र शासन लागत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहणार.
पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते. दहा ते पंधरा दिवस झाले अद्यापही कोणतेही कारवाई केलेली निदर्शनास न आल्यामुळे आज पासून तुळजापूर तहसील कार्यालय समोर असंख्य महिलांचे आमरण उपोषण.