मंगरुळ / प्रतिनिधी : – ( चांदसाहेब शेख )
तुळजापूर येथील हेलिपॅड येथे वास्तव्यास असलेले प्रकाश गवळी महाराज यांच्या मुलीचा मुलगा रुद्र प्रशांत सुरवसे वय ४ वर्ष याने कुठलेही शिक्षण न घेता लिहता वाचता येत नसतानाही केवळ श्रवणाने ऐकून भगवतगीतेतील १५वा अध्याय मुखोदगत केला आहे त्याच बरोबर त्याला भजन , काकडा आरती , पांडुरंग स्तुती , पसायदानही तोंडपाठ आहे त्याला यासाठी सर्वोतोपरी मदत वारकरी संप्रदायातील त्याची आई , आज्जी , आजोबा हे करत आहेत
सध्याची तरुण पिढी केवळ वॉट्सप , फेसबुक , इन्स्टाग्राम व सोशल मिडियाच्या विळख्यात जखडली जात असताना त्यांना धार्मिकतेचा लवलेश ही नसल्याचे दिसून येत असताना हे रूद्रचे यश वाखानण्याजोगे आहे
खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जीवन कसं जगावं हे ज्ञान फक्त आणि फक्त पोथी पुराणातुनच मिळत.पूर्वी प्रत्येक गावात मंदिरावर घरोघरी अनेक देव देवतांचे ग्रंथ वाचन निरुपण केले जायचे त्यामूळे आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आपण नेमक या क्षणभंगुर जीवनात काय आचरण केले पाहिजे हे या ग्रंथातून आत्मसाद व्हायचे त्यामूळे पूर्वीचे माणसं ही प्रेमळ मायाळू व विश्वासू होते पण कालांतराने या फेसबुक व्हॉट्स ॲप मोबाइल च्या युगात पोथी पुराण वाचन निरुपण दुरापास्त झाले त्यामूळे या मोबाइल युगात तरूण पिढी मोबाइलच्या विळख्यात अडकली व माणूस म्हणून कसं जगावं या ज्ञानार्जनापासुन वंचित झाली त्याचा परिणाम म्हणून व्यसन करणे थोरमोठ्याचा अनादर करणे आई वडिलांना कमी लेखणे देवाचं अस्तित्व न मानणे यामुळे खऱ्या सुखापासून तरुणाई दूर गेली. तरुणांमध्ये नव चैतन्य यावे भगवान प्रभु रामचंद्र यांनी अधर्माने आचरण करणाऱ्या राक्षसांचा निपांत करून धर्माची घडी बसवली व रामराज्य निर्माण केले. त्याच प्रभु रामचंद्र यांच्या नाम स्मरणाची गोडी तरूण पिढीला लागावी व पांडुरंगाचे नामस्मरण करून या बालकाचा आदर्श तरुणांनी घ्यावा असे वारकरी संप्रदायातुन बोलले जात आहे त्याच्या अवघ्या चार वर्षांच्या वयातील यशस्वी वारकरी संप्रदायाच्या पदार्पणबद्दल अभिनंदन व कौतुक केले जात आहे