spot_img
26.6 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांची नियुक्ती

मुंबई / प्रतिनिधी :-

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून महाराष्ट्र काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमध्ये सतेज पाटील, अमिन पटेल, अमित देशमुख, विश्वजित कदम आदी नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदा-या सोपवण्यात आल्या आहेत. विधिमंडळात काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाली असली तरी उत्साह व ऊर्जा कायम असून जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल. सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी पक्षाचे नवे शिलेदार महत्त्वाची भूमिका बजावतील, अशा शब्दात प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सर्व नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या