तुळजापूरच्या तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यावर पत्रकार ॲक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा .
तुळजापूर प्रतिनिधी : –
पत्रकार हा चौथा स्तंभ असून जनतेपर्यंत चालू घडामोडी पोचवण्याचं काम करणारा जनतेच्या व शासनाचा मधला बिंदू असून पत्रकाराबाबत शासनाने अनेक कायदे केले असून फक्त कायदा कागदावरच का काय असा प्रश्न निर्माण झाला असून यापूर्वी पत्रकारांविषयी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाही करणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते .परंतु तुळजापूर मध्ये पत्रकारांनाच आर्वोच्च भाषेमध्ये बोलून अपमानित करण्याची घटना तुळजापूर येथील तहसील कार्यालय येथे घडली असून याबाबत पत्रकार सुरक्षा समिती यांच्या वतीने नुतन जिल्हाअधिकारी श्री कीर्ती किरण पुजार साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सदर निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की 25 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांचे बेकायदेशीर वीट भट्टी बाबत सामूहिक आत्मदहन तहसील कार्यालय येथे होणार असल्याची माहिती पत्रकार बांधवांना मिळाल्यानंतर पत्रकार बांधव हे आंदोलनस्थळी बातमी संकलनासाठी गेलो असता तुळजापूर तहसीलदार श्री अरविंद बोळंगे यांनी पत्रकारांना बातमी संकलन करत असताना
पत्रकारांना अरेरावी भाषा करीत तुम्ही अगोदर बाहेर जा, शूटिंग करू नका, मला माहित आहे पत्रकार कसे असतात ते. असे म्हणून उद्धट वर्तन करून विवाद घालवण्याचा प्रयत्न केला व पत्रकारांना अपमानित केले. सदर आंदोलन स्थळी तुळजापूर पोलिस निरीक्षक अनिल मांजरे यांच्या मदतीने हे अंदोलन आंदोलनकर्त्यांनी स्थगित करण्यात आले असता सर्व पत्रकार बांधव हे तहसीलदार यांच्या केबिनमध्ये गेले असता आंदोलन संदर्भाबाबत प्रतिक्रिया द्या असे म्हणताच तहसीलदार यांनी पत्रकार यांना प्रतिक्रिया न देता पत्रकारांना अरेरावी करून केबिन बाहेर जाण्याचा सल्ला दिला. अशाप्रकारे पत्रकारांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या मुजर व कर्तव्यहीन तहसीलदार श्री अरविंद बोळंगे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तात्काळ निलंबित नाही केल्यास महाराष्ट्रातील सर्व पत्रकार सनदशीर मार्गाने राज्यभर आंदोलन करतील.
याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल. तहसीलदार श्री अरविंद बोळंगे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करावे.अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर पत्रकार सुरक्षा समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रवीण राठोड,जिल्हा अध्यक्ष राहुल कोळी,जिल्हा उपाध्यक्ष रुपेश डोलारे, मकबुल तांबोळी, हैदर शेख,सारिका चुंगे,लहू कुमार शिंदे,चांद शेख,गणेश कांबळे,सलीम पठाण,आकाश हळकुंडे व अन्य पत्रकार बांधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .तर सदर निवेदन माहितीस्तव : मा. उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री
अजित पवार,मा. गृहमंत्री
महाराष्ट्र राज्य, मा. महसूल मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील ,मा. पालकमंत्री
प्रताप सरनाईक ,पोलीस अधीक्षक धाराशिव. यांना हे निवेदन देण्यात आले आहे .