spot_img
5.9 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

श्री कुलस्वामिनी आश्रम शाळेत मराठी गौरव भाषा दिन उत्साहात साजरा

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

जळकोट तालुका तुळजापूर येथील श्री कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत 27 फेब्रुवारी हा कविवर्य ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कवी, कथाकार, नाटककार, कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर जयंती मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोट चे सचिव तथा प्राचार्य श्री संतोष चव्हाण साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून जवाहर महाविद्यालयाचे प्रा.गिते सर,प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आशा पवार मॅडम, इंदिरा गांधी आदर्श माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विनायक राठोड, माध्यमिकआश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री गुरव एन.एम होते सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष चव्हाण सर प्रमुख अतिथी प्राध्यापक गिते सर मुख्याध्यापिका आशा पवार यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन केले प्रतिमा पूजनानंतर शाळेतील मराठी विषय विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष चव्हाण सर यांचे स्वागत श्री हक्के बी.जी.यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.व प्रा.गिते सर यांचे स्वागत कदम डी.टी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले सर्वप्रथम सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर शाळेत निपुण भारत अंतर्गत इयत्ता आठवी, नववी, दहावी वर्गातील मराठी विषय मित्र विद्यार्थी इयत्ता आठवी राठोड सानिका, चव्हाण अक्षरा,इयत्ता नववी नेहा राठोड ,चव्हाण मोनिका , इयत्ता दहावी वर्गातील राठोड राजश्री व मंडले प्रदीप य वर्गातील मराठी विषय मित्र या विद्यार्थ्याचे मराठी भाषा दिनास अनुसरून मराठी विभागाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी कार्यक्रमास अनुसरून विद्यार्थ्यांनी भाषण केले त्यानंतर मराठी विषय शिक्षक श्री हक्के बी.जी. यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाची माहिती दिली अध्यक्षीय भाषणात संतोष चव्हाण सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले मराठी भाषेचा* *व्यवहारात वापर करावा इतर भाषा शिकव्यात पण मराठी भाषेचा अभिमान बाळगा, पण इतर भाषांना पण तेवढेच महत्व द्या आजच्या कार्यक्रमात दिल्लीत साहित्य संमेलनात संमेलन-अध्यक्ष डॉ. तारा भवाळकरांचे अप्रतिम भाषण विद्यार्थ्यांना ऐकण्यात आले
कार्यक्रमाचे योग्य नियोजन हक्के बी.जी.राठोड बी.बी.व कदम डी.टी. यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राठोड बी.बी. यांनी केले* *मराठी विषय शिक्षक श्री हक्के बी.जी. यांनी सुमधुर भाषेत सूत्रसंचालन केले आभार कदम डी.टी..यांनी मानले* *कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजीत चव्हाण,ढोल के.ए.मुखम बी.एस.पांढरे डी.एम. दुधभाते एस.एन.कोकाटे एस.एम,साबळे ए.एच.श्रीमती कुचंगे पी.एस.लवंद के.बी. अश्विनी लबडे, शांताबाई चौगुले,कुमारी मयुरी कांबळे,अमित खारे,शंकर चव्हाण व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या