मुरुम, ता. उमरगा, ता. २७ (प्रतिनिधी) :-
येथील रोटरी क्लब मुरुम सिटी, ग्रामीण रूग्णालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आनंदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदनगर शाळेत महिला-पुरूष व विद्यार्थ्यांची सर्वरोग निदान आरोग्य शिबिर रोटरी डे व महाशिवराञीचे औचित्य साधुन गुरुवार (ता. २७) रोजी घेण्यात आले. प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलाकर मोटे यांच्या हस्ते डाॅ. तेजस्वीनी सोनवणे, डाॅ. सागर काबरा, डाॅ. गिरिष मिनियार, मुख्याध्यापक बाबुराव पवार यांच्या उपस्थितीत दंतचिकित्साचे प्रात्यक्षिक करुन करण्यात आले. यावेळी नागरिक, विद्यार्थी यांची तपासणी करुन औषधे देण्यात आली. रोटरीचे संतोष कांबळे, प्रा. डाॅ. अप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा. राजकुमार वाकडे, कलप्पा पाटील, आरोग्य विभागाचे सुजित जाधव, वैष्णवी शिंदे, शिक्षक सुनिता खंडागळे, तानाजी बिराजदार आदींनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना राजगिऱ्याचे लाडु वाटप करून संध्या पुजारी यांनी अभार मानले. फोटो ओळ : आनंदनगर, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत सर्व रोग निदान शिबिराप्रसंगी डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करताना रुग्ण व अन्य.