इटकळ / प्रतिनिधी :- (दिनेश सलगरे)
महाशिवरात्री निमित्त मौजे दिंडेगाव येथे जीवन मुक्ती सेवा मंडळ ट्रस्ट धनगरवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने भाविकांना फराळाचे वाटप.गेल्या आठ वर्षापासून हा उपक्रम जीवन मुक्ती सेवा मंडळ ट्रस्ट सचिव दीपक महाराज निकम अध्यक्ष बळीराम सुरवसे राबवत आहे.
यासाठी गावातील सर्व लहान थोर मंडळींचे व भाविकांचे योगदान व सहकार्य मोठ्या प्रमाणात दिसून येते
गेल्या आठ वर्षापासून चाललेल्या उपक्रमाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत असून उपक्रमात गावातील तरुण मंडळ गावातील जेष्ठ नागरिक गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्वांचा सहभाग आहे त्यामुळे हजारो भाविकांनी फराळाच्या प्रसादाचा लाभ घेतला.फराळ वाटपाच्या कार्यक्रमाला जीवन मुक्ती सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष- बळीराम महाराज सुरवसे, सचिव- दीपक महाराज निकम, विश्वस्त -जगन्नाथ लोकरे , सरपंच- नागनाथ घोडके, तंटामुक्त अध्यक्ष- सुभाष केशव घोडके, प्रताप घोडके, तुकाराम लोकरे, विशाल जेडगे, संकेत सुरवसे, समर्थ हळदे , संस्कार घोडके , रोहित घोडके , गणेश सुरवसे , कुणाल लोकरे , विठ्ठल लोकरे , चेतन दूधभाते आदी गावातील सर्व तरुण मंडळ यावेळी उपस्थित होते. यावेळी दीपक महाराज निकम यांनी सर्वांचे आभार मानले.