spot_img
12.9 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जवाहर मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा 

अणदूर / प्रतिनिधी :-

जवाहर विद्यालय, अणदूर येथे आज(27 फेब्रुवारी) रोजी ‘ अभिजात मराठी राजभाषा दिन साजरा ‘ करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी व मराठी विषय शिक्षक सिध्देश्वर मसुते,प्रमिला सलगरे,संध्या जाधव,जयश्री रेडेकर,अश्विनी केंद्रेकर यांनी जेष्ठ कविवर्य,नाटककार, पटकथाकार,समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.मराठी राज भाषादिनानिमित्त विद्यार्थी आरूष बलसुरकर,करण गिरी,रजत गायकवाड,अदित्य घोडके,शुभांगी गिराम,श्रीकांत शिदोरे,अक्षय घोडके,पूर्वी जाधव,कृष्णा कुताडे,गायत्री बिराजदार,निधी बिराजदार,श्रृती नाईकवाडे,अपूर्वा बिराजदार यांनी मराठी भाषेचे महत्त्व,विविध सामुदायिक गीते,कविता सादर केल्या.शिक्षक मनोगतात मसुते सर ,श्रीमती रेडेकर,ज्योती चौधरी यांनी मराठी राजभाषा साजरा दिन,मराठी साहित्य प्रकार,दैनंदिन जीवनात मराठीचा वापर,अभिजात मराठी राजभाषा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,संतांचे साहित्य,मराठी साहित्य प्रकार,लोकमान्य टिळक यांचे मराठी भाषेबद्दलचे विचार,बदलेल्या जीवनशैलीमुळे मराठीची अवस्था,विद्यार्थी-नागरिक म्हणून आपली जबाबदारी यावर मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांनी मराठी भाषेला मोठी परंपरा आहे म्हणूनच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, महाराष्ट्र संतांची भूमी आहे,अनेक संतांनी उत्तम मराठी साहित्य निर्माण केले,मराठीत संवाद करताना इंग्रजीचा वापर का करावा,कशासाठी करावा याचे भान आपणास नाही.इंग्रजी ही भाषा आहे त्या भाषेचे ज्ञान नक्कीच घ्यावे,पण त्याच्यासोबत वाहून जाऊ नये,त्यात मराठी संपेल असे आपले वर्तन नसावे, मराठीचे नियमित वाचन,लेखन असावे,महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमधून मराठी विभागामार्फत उत्कृष्ट शिक्षण देण्याची सुविधा शासनाने उपलब्ध केली आहे,आपल्या मातेवर ज्या पध्दतीने प्रेम असते, त्याप्रमाणे मराठी भाषेवर ही प्रेम करा,दैनंदिन व्यवहारात मराठी शब्दांचा आवर्जून वापर करा.
असे मत व्यक्त केले.यावेळी विद्यालयातील सर्व मराठी विषय शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थींनी आर्या घुगे,श्रृती नाईकवाडे यांनी केले तर आभारप्रदर्शन रोहित मोरे यांनी केले.

यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या