spot_img
26.6 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमाणपत्र व प्राचार्य डॉ संजय अस्वले यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार

 

मुरुम / प्रतिनीधी :-

महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा अंतर्गत महाराष्ट्रातील 50 महाविद्यालयांना सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून प्रमाणित करण्यात आले.महाविद्यालयाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स चे प्रमाणपत्र आणि निधी
तसेच 2024-25 चा श्री छत्रपती संभाजीनगर विभागातील उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार प्राचार्य डॉ संजय अस्वले यांना मा. प्रफुल्ल पाठक, सेक्रेटरी पॉवर सेक्टर स्किल दिल्ली, मा बाबासाहेब वाघमारे लायझनिंग ऑफिसर, ऊर्जा विभाग मंत्रालय, मा राज देशमुख, संस्थापक वुई फाउंडेशन, सिंघानिया कंपनीचे सीआयओ, मा. शंकर जाधव, प्रीआयएस सेंटर मुंबई संचालिका मा.भावना पाटोळे, पोलीस आयुक्त निलेश घटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहामध्ये आयोजित करिअर कट्टा एकदिवसीय कार्यशाळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 25 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमात या कार्यशाळेसाठी व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याची उद्योग मंत्री ना उदयजी सामंत यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले

यावेळी करिअर कट्टा प्रमुख मा. यशवंत शितोळे, आवाजाची कार्यशाळा चे मा. सोनाली लोहार, इमोशनल इंटेलिजन्स च्या मा. मिथिला दळवी मा. प्राचार्य प्रज्ञा प्रभू, मा. प्राचार्य अतुल साळुंखे, मा. डॉ दीपा वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास करिअर कट्ट्याच्या वतीने गेली तीन वर्षे सेंटर ऑफ एक्सलन्स प्रदान करण्यात आले आहे. गतवर्षी या सेंटर ऑफ एक्सलन्स बी ग्रेड होता यावर्षी महाविद्यालयाने करिअर कट्ट्याच्या माध्यमातून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ए प्लस दर्जा देऊन सन्मान केला आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी 2024-25 या शैक्षणिक वर्षात धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक म्हणून करिअर कट्ट्याच उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संपूर्ण श्री छत्रपती संभाजी नगर विभागातून उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून पुरस्काराने सन्मान मुंबई येथील विशेष कार्यक्रमात करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल आणि डॉक्टर अस्वले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.अमोल शिवाजीराव मोरे, उपाध्यक्ष मा.आश्लेष शिवाजीराव मोरे, सरचिटणीस मा.जनार्दन साठे, सचिव मा.पद्माकरराव हराळकर, सहसचिव मा.डॉक्टर सुभाष वाघमोडे, आणि सर्व संचालक मंडळ, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले, उपप्राचार्य प्रा जी एस मोरे, पर्यवेक्षक प्रा शैलेश महामुनी, प्रबंधक राजकुमार सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या