अणदूर / प्रतिनिधी :-
आपण कितीही मोठे झालो तरीही ज्या शाळेमुळे आपण मोठे झालो त्या शाळेसाठी काहीतरी करण्याची जिद्द मनी बाळगणे ही फार मोठी गोष्ट असून नेमकी तीच गोष्ट, दत्तू आण्णा पाटील विद्यालयात शिकून गेलेल्या सन2000ते 2001 या वर्षातील 10 वि च्या विद्यार्थ्यांनी करून एक आदर्श निर्माण केला असून ,आपण कितीही मोठे झालो तरी ज्या शाळेने आपणास घडवले त्याचे ऋण कधीच फेडता येत नसतात असे प्रतिपादन तुळजापूर तालुक्याच्या माजी पंचायत समिती सभापती,तथा चिवरी येथील ज्ञानविकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मनीषाताई पाटील यांनी व्यक्त केले.
त्या चिवरी येथील दत्तू पाटील (आण्णा)माध्यमिक विद्यालयात सन 2000 ते 2001 या शैक्षणिक वर्षात शालांत प्रमाणपत्र परीक्षेत बसलेल्या म्हणजेच दहावी बॅच च्या 45 विद्यार्थ्यांनी आयोजित स्नेह बंध अर्थात (गेट-टुगेदर) या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या या वेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव पाटील, मुख्याध्यापीका लक्ष्मी बिराजदार संस्थेतील सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता,या वेळी 45 माजी विद्यार्थ्यांनी ही शाळा ग्रामीण भागातील तरुणांचे भविष्य घडवणारी असून आम्ही या शाळेसाठी काहीतरी मोठे करणार असल्याचे सांगितले,तसेच जुन्या आठवणींच्या स्मृतीला उजाळा देऊन भूतकाळातील आनंदाच्या क्षणांना पुन्हा एकदा अनुभवण्याचा क्षण साजरा करण्यासाठी स्नेह बंध अर्थात (गेट-टुगेदर) हा कार्यक्रम संपन्न केला,असल्याचे सांगितले.
या वेळी शाळेतील शिक्षक.शिंदे एस .एम ,शिंदे एस.बी , मस्के एस.ए., सूर्यवंशी के . एस , ठाकूर के. पी .,श्रीमती ढगे एस. बी , शिंदे बी .बी, युवा प्रशिक्षणार्थी महेश सूर्यवंशी, घोडके पी एल ,सूर्यवंशी बी एल आदी शिक्षकांनी शाळेचे तास घेतले.
या स्नेहबंध कार्यक्रमात अनेक वेगवेगळे मनोरंजनपर खेळ घेतले गेले त्या खेळात प्रथम येणाऱ्या खेळाडूस ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम अतिशय आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न करण्यासाठी राजकुमार भातागळे, विकास बलसुरे, सुरेश हिंगमिरे ,आनंद साखरे, भैय्या इंगळेअमोल बिराजदार, वैभव कोरे, रमा भुजबळ राहुल नगदे आण्णा काळे लक्ष्मण शिंदे गिरजाप्पा झांबरे यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका अश्विनी लबडे याने केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष पवार यांनी केले कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्याचे काम स्वाती सूर्यवंशी यांनी केले.