मुरुम, ता. उमरगा, ता. २३ (प्रतिनिधी) :
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, दिल्ली व मुरुम शाखेकडून संत निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ७१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून संपूर्ण जगात हा दिवस स्वच्छता मोहीम म्हणून साजरा केला जातो. सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपा आशीर्वादाने रविवारी (ता.२३) रोजी स्वच्छ चल स्वच्छ मन मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरूम रोटरी क्लबच्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, महाराष्ट्र पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, बालाजी व्हनाजे, मुख्याध्यापिका अलका गायकवाड, नळदुर्गचे राजेंद्र पोतदार, प्रा. डॉ. महेश मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कल्लेश्वर पांचाळ, रमेश मिणीयार, तुकाराम शेवाळे, सुरेश कोळी, सुधाकर नारायणकर, हनुमंत पोतदार, प्रा. त्रिंबक व्हटकर, दगडू दिक्षीवंत, लक्ष्मण राठोड, हणमंत मंडले, राजेंद्र सुपेकर, ग्यानप्रकाश यादव, किशोर चव्हाण, परमेश्वर जाधव, महादेव देडे, अमोल कटके आदींनी पुढाकार घेतला. शाळेच्या आतील व बाहेरील परिसरातील झाडे-झुडपे तोडून स्वच्छता सेवादल बिरु बंदीछोडे, दत्ता बोडरे, गुंडेराव चौगुले, प्रमोद नारायणकर, शिवाजी राठोड, विष्णू पवार, बालाजी कसबे, बसवराज बिराजदार, योगेश भोकले, शुभम कोकणे, दयानंद व्हनाळे, प्रसाद सुपेकर, व्यंकट इगवे तर सेवादल बहिणजी अनुसया नारायणकर, अनिता देडे, गुरुदेव बोडरे, मंगल बनसोडे, भाग्यश्री घोडके, श्रध्दा साखरे आदिंनी घनकचरा, गवत, झाडांना आळे, पाणी घालून परिसर स्वच्छ केला. उषा साखरे, मंगल घोडके, सुनिता व्हटकर, अश्विनी पांचाळ, मुक्ताबाई कोळी, भारत बेगमपुरे, बालिका बनसोडे, जयश्री सोनवणे आदिंनी स्वच्छता फलकाचा प्रचार करून स्वच्छतेचा संदेश दिला. कमल शेवाळे यांच्या गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नितीन डागा यांनी मनोगत व्यक्त करताना ग्राम स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराजांची जयंती व बाबा हरदेवसिंग महाराजांचा जन्मदिवस हा अतिशय योगायोग आहे. संत निरंकारी मंडळाचे स्वच्छता अभियान ही केवळ एक मोहीम नसून समाजसेवेचे आणि नैतिकतेचे एक उत्तम उदाहरणच आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे स्वच्छता अभियान निरंतर व अखंडपणे चालू असल्याचे समाधान त्यांनी शेवटी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात सुवर्णा पाटील म्हणाल्या की, माणसाला आतून व बाहेरून मानसिक, आत्मिक समाधान देणारा हा उपक्रम आहे. तरुणांना सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी, शहर व परिसर स्वच्छ व्हावा, हा या अभियानाचा खरा उद्देश आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षण, जनजागृती आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या अभियानाचे प्रास्ताविकपर मनोगत निरंकारी मंडळाचे मुखी दयानंद साखरे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. महेश मोटे तर आभार मीरा मोटे यांनी मानले. शहर व परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील संत निरंकारी मंडळाकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा परिसर स्वच्छ करताना पुरुष व माता भगिनी.