उमरगा /प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवछत्रपती प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या शिबिरात युवकांनी व महिलांनी रक्तदान केले, यावेळी 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलीप भालेराव, चंद्रकांत हेंडले, काशिनाथ करके, रतन लामजने, अप्पराव मुळे, मल्लिनाथ मातोळे
यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर समाजातील लोकांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अशी सामाजिक उपक्रम आयोजन करण्यामुळे त्यांचा आदर्श नवा युवक वर्ग पुढे आणतो. या शिबिरात युवक, तसेच 5 महिलांनी स्वफुर्तीने रक्तदान केले.
रक्त संकलन श्रीकृष्ण ब्लड सेंटर उमरगा येथील विजय केवडकर, किशोर खरोसे,राम चव्हाण,ऋतिक म्हेत्रे यांनी ब्लड कॅम्प साठी ब्लड बँकेतर्फ हजेरी लावली. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गुलचंद मातोळे, गोपाळ पाटील, सचिव महादेव भोईटे, खजिनदार कालिदास भुजबळ, पुरुषोत्तम मुळे, भालचंद्र मातोळे, सिद्धेश्वर माने, विष्णु शिंदे,राम मुळे, गणेश मुळे,बळी भोईटे, सतीश मुळे, ज्ञानेश्वर भुजबळ, नवनाथ शिंदे, गहीनाथ शिंदे,ओमकार मातोळे यांच्यासह सर्व सदस्यांनी, शिवभक्तांनी परिश्रम घेतले.



                                    
