धाराशिव न्यूज रिपोर्टर : – विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील येथे संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था यांच्या वतीने स्वच्छतेचे जनक संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी बाळकडू पत्रकार विजय पिसे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून समर्थ क्लासेस, बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था जळकोट यांच्यातर्फे लेखक रामशेट्टी पाटील सर यांच्या तर्फे परीट समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वलिखित द इंग्लिश लैंग्वेज या पुस्तकाच्या ११ प्रतीचा संच देण्यात आला. यावेळी बसवराज मडोळे सर, अनिल मडोळे, लक्ष्मण मडोळे, रामशेट्टी पाटील ,परमेश्वर मडोळे, माणिक मडोळे, नागनाथ मडोळे, मल्लिनाथ मडोळे, राजेंद्र मडोळे, संतोष मडोळे, धनराज मडोळे, रवी मडोळे, सदाशिव मडोळे, सतीश मडोळे, महावीर बारदाने, मोहन काळे, मयूर मडोळे, आदित्य पांचाळ, गणेश कोरे, बळीराम मडोळे आधी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.