जळकोट, दि.२२(मेघराज किलजे):
मूर्टा गावामध्ये राजमुद्रा प्रतिष्ठानतर्फे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ५० शिवभक्त यांनी रक्तदान केले. ह.भ.प. अरुंधती गवळी यांचे कीर्तन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मूर्टा यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात सोनम कदम व वर्षा भुरे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम उत्साहात पार पाडला. राजमुद्रा प्रतिष्ठानतर्फे व सर्व गावकऱ्यांतर्फे कलाकारांचे आभार मानले.