जळकोट, दि.२२(प्रतिनिधी):
भीमनगर, जळकोट जि.प.प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन समिती अध्यक्ष श्री. उमेश लोखंडे व उपाध्यक्ष श्री युवराज लोखंडे, सतीश माने, अरुण लोखंडे, बालाजी माळी यांच्या हस्ते करण्यात आले. शिवरायांच्या कार्याबदल व जिवन संघर्ष याबाबत माहिती श्रीमती रोहिणी पवार यांनी माहिती दिली. आरती लोखंडे, श्रुती भालेराव, शिवानी लोखंडे, आदिती माने,आदेश माने, सत्यजित लोखंडे, तुकाराम लोखंडे यांनी वेषभूषा करून शिवरायांचा इतिहास निर्माण केला होता .यावेळी माता, पालक, भगिनी उपस्थित होत्या.
भीमनगर शाळेत शिवजयंती
- Advertisement -