तुळजापूर / प्रतिनिधी :-
श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ.सचिन ओंबासे यांची बदली सोलापूर येथे महानगरपालीका आयुक्त म्हणून झाली.
आज दि.२२ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री तुळजा भवानी मंदिरच्या प्रशासकीय कार्यालयात त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम व भोपे पुजारी सचिन कदम यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून सत्कार केला.