spot_img
5.2 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

सिना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा बंधाऱ्यात पाणी दाखल

 

धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील रब्बी हंगामाकरीता पाण्याची गरज असून पाण्या आभावी शेतकऱ्यांची पिके सुकत आहेत तसेच परांडा तालुक्यातील भोत्रा, रोसा व परांडा शहरासाठी पाणी पुरवठा भोत्रा येथील बंधाऱ्यातून होत असून सिना कोळेगाव प्रकल्पांतून पाणी सोडणे बाबत शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख श्री. रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी शेतकऱ्यांची व नागरीकांची मागणी अनुषंगाने कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करुन सिना कोळेगाव प्रकल्पातील भोत्रा बंधाऱ्यात पाणी सोडणेबाबत पत्राव्दारे विनंती करण्यात आली होती. दि. 10/02/2025 रोजी दुरदृष्य प्रणालीव्दारे मा. पालकमंत्री साहेब यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.

सिना कोळेगाव प्रकल्पातील रब्बी हंगामाकरीता पाणी भोत्रा बंधाऱ्यात सोडण्यात आले आहे. यामुळे परीसरातील रब्बी हंगामातील व बागायती पिकांना जिवदान मिळाले असून यामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनावरांच्या व परीसरातील ग्रामपंचायतीस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून परीसरातील नागरीकांकडून याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या