spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

 

धाराशिव दि १९ फेब्रुवारी (जिमाका) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आज १९ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप इंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.या मान्यवरांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या