अणदूर / प्रतिनिधी :- ( चंद्रकांत हगलगुंडे )
अणदुर दिनांक शनिवार व रविवार दिनांक 22, 23 फेब्रुवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन युवा जल्लोष व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि 22 फेब्रुवारी 2025 रोजी स.ठीक 10 वा. प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव, श्री. रामचंद्र दादा आलूरे , जवाहर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. डॉ. भालचंद्र बिराजदार, ॲड. लक्ष्मीकांत पाटील, प्राचार्य डॉ . उमाकांत चनशेट्टी, प्राचार्य, गोपाळ कुलकर्णी ,उपप्राचार्य डॉ.मल्लिनाथ लंगडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पारंपारिक वेशभूषा स्पर्धा काव्यवाचन स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा , मेहंदी स्पर्धा, विविध गुणदर्शन, आनंद नगरी ,शेलापागोटे व रविवार दिनांक 2025 रोजी सायं.4:00 वा. शैक्षणिक ,क्रीडा , सांस्कृतिक व वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिमरन खेडकर यांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तरी या संधीचा लाभ विद्यार्थी, पालक,कलाप्रेमी व रसिकानी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे वतीने करण्यात येत आहे.