जळकोट / प्रतिनिधी :- दि.१९(मेघराज किलजे):
येथून जवळच असलेल्या आलियाबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयात रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत राठोड, माणिक राठोड, यशवंत राठोड, सिद्राम पवार,नेमिनाथ चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, शिवाजी चव्हाण, हरीदास राठोड, बाबु राठोड, अरुण चव्हाण, मोतीराम राठोड,रेवाप्पा राठोड,
विनोद चव्हाण, रतन चव्हाण,राम पवार, तानाजी राठोड,मनोज पवार आदि उपस्थित होते.