spot_img
5.9 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

शिवचरित्रातून राष्ट्रीय चारित्र्य घडते – भैरवनाथ कानडे

जळकोट येथे जागर शिवचरित्राचा व्याख्यानास उत्स्फुर्त प्रतिसाद

जळकोट / प्रतिनिधी :- ( विजय पिसे )

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व व विश्वकल्याण प्रत्यक्षात उतरवणारा आणि लोककल्याण हेच अंतिम ध्येय असणारा कृतीशील राजा . रयतेचे कल्याण व संरक्षण हे त्यांच्या प्रशासनाचे मुख्य सूत्र असल्याने हिंदुस्थानच्या इतिहासात ‘रयतेचा राजा ‘ म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली . स्वराज्य स्थापनेच्या युग कार्याबरोबर एक राष्ट्रीयत्वाची त्यांची धारणा होती . शिवप्रभुंचे अलौकिक कार्य , निष्कलंक चारित्र्य आणि प्रेरणादायी ‘शिवचरित्र ‘ हे आपण कितपत आचरणात आणतो यावरच आमच्या राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे . तेव्हा धर्मनिरपेक्षता तत्वप्रणालीचे विलोभनीय दर्शन घडविणाऱ्या शिवचरित्र कार्यातून राष्ट्रीय चारित्र्य घडवता येते . असे मत महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार विजेते तथा शिव व्याख्याते भैरवनाथ कानडे यांनी व्यक्त केले .तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्ताने आयोजित “जागर शिवचरित्राचा ” या व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ‘शिवचरित्र जगण्याची प्रेरणा ‘ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोटचे सरपंच प्रा .गजेंद्र कदम हे होते . यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच अशोक पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण , उपसरपंच प्रशांत नवगिरे , महेश कदम , ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे,नामदेव कागे,जीवना कुंभार, अनिल छत्रे , तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत कदम, कृष्णात मोरे, विजयकुमार मोरे , डि. डि. कदम , पत्रकार अरुण लोखंडे , संजय रेणुके ,निलकंठ इटकरी आदींची उपस्थिती होती .या व्याख्यानमालेतील दुसऱ्यासत्रात दुसरे पुष्प गुंफताना शिवव्याख्याते डॉ . संतोष पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्रमालिका त्यांचे सर्वधर्मसमभाव अधोरेखित करणारे मानवतावादी जीवन कार्य याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले .कार्यक्रमाच्या प्रारंभी येथील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली . मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . कार्यक्रमाचे
प्रास्ताविक गजेंद्र पाटील यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विश्वास भोगे यांनी केले .कार्यक्रमास शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या