उमरगा / प्रतिनिधी :- ( मारुती कदम )
उमरगा तालुक्यातील मुळज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सांस्कृतिक कला महोत्सव घेण्यात आला. या कला महोत्सवात विद्यार्थी कलावंतानी लावणी , भारूड , गवळण , गोंधळ या सह देशभक्तीपर गीतांचे बहारदार सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. लमाण तांडयावर वास्तव्य करणाऱ्या शाळकरी चिमुकल्या कलावंत विद्यार्थ्यानी विविध देशभक्ती पर गीतांचे अप्रतिम सादरीकरण करून लमाण तांड्यावर देशभक्तीचे दर्शन घडवून आणले.
या शाळेचे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक बळीराजा घोरवाडे यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली होती. श्री गणेशा देवा , आला रे आला सिंबा आला. गाडी घुंगराची , मला लागली कुणाची उचकी, झुंजू मंजू पहाट झाली. ओ शेठ तुम्ही नादच केला थेट. पिचली माझी बांगडी , आपलीच हवा , दर्या किनारे एक बंगलो, मेरा कर्मा मेरा धर्मा तू , राजे छत्रपती शिवाजी महाराज या सह आदि लोकगीते , भारूड, लावणी , गवळण, भक्तीगीते , पोवाडा या विविध कला प्रकारांचे सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली !
यावेळी सरपंच महेश शिंदे, माजी सरपंच , आप्पासाहेब वडदरे, कविता राठोड ,विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके,केंद्रप्रमुख भरत चौधरी , दत्ता पाटील , शालेय समितीचे अध्यक्ष भास्कर राठोड , उपाध्यक्ष मिथुन चव्हाण, शिवराम जाधव , अमोल चव्हाण, सतीश राठोड, संजय राठोड आदि सह ग्रामस्थांनी कला महोत्सव यशस्वी करण्या साठी विशेष परिश्रम घेतले. उमरगा येथील नाते मैत्री ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.सुत्रसंचलन आनंद मोरे व धनराज कुडकुले यांनी केले. बंजारा तांडयावरील विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या विविध कला अविष्काराचे सर्वत्र कौतुक होत आहे.