अणदूर / प्रतिनिधी :- ( चंद्रकांत हगलगुंडे)
जवाहर महाविद्यालय अणदूर येथील संस्कृत विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळा व राज्यस्तरीय निबंध पारितोषिक वितरण सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक मा. जे. एन. काकनाळे, डॉ.मल्लीनाथ लंगडे, प्रमुखपाहुणे डॉ. अंकुश कदम, डॉ. अरुण चव्हाण तसेच संयोजक प्रा.डॉ. सत्येंद्र राऊत यांच्या हस्ते प्रारंभी शिक्षण महर्षी सि.ना. आलुरे गुरुजी आणि सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन केले. यानंतर संस्कृत गाण्यातून कु.सई माने, श्रुती कुताडे, समीक्षा घुगे व शिवानी मुळे हिने नृत्य सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर कु. देवयानी घोडके, रुद्राली सारणे, अक्षता मोकाशे हिने स्वागत गीतावर नृत्य सादर केले. यानंतर डॉ. अरुण चव्हाण यांनी संस्कृत भाषेचा इतर भाषांवर पडलेला प्रभाव या एक दिवसीय कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. जे.एन.काकनाळे आणि विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रमुख पाहुणे मा.अंकुश कदम सर यांनी संस्कृत भाषेचा इतर भाषांवर पडलेला प्रभाव याविषयी सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेप्रसंगी डॉ. संगीता सरवदे, अनिता मुदकण्णा, मीना जाधव यांनी पेपर सादर केले. पहिल्या सत्रात उपप्राचार्य डॉ. मल्लीनाथ लंगडे सर यांनी अध्यक्षीय समोराप केला नंतर द्वितीय सत्रात संस्कृत विभाग प्रमुख प्रा.सत्येंद्र राऊत यांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचे प्रास्ताविकपर मनोगतात राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांना मार्गदर्शन केले राज्यातून एकूण दोनशेच्या जवळपास निबंध आले होते त्यापैकी सर्वोत्कृष्ट सौ. मंजश्री पवार सातारा, उत्कृष्ट कु. पर्जन्या अंजूटगी सोलापूर, प्रथम सौ. प्रगती ज्योतिर्लिंग शिंदे जवाहर महाविद्यालय अणदूर , द्वितीय श्वेता हालगे परळी वै. आणि तृतीय अमृता डोईफोडे लातूर तर उत्तेजनार्थ वैष्णवी पाटील लातूर , सौ. सुलभा खुळे करमाळा व श्वेता गरड खेड, या सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी धाराशिव येथील डॉ. अस्मिता बुरगुटे यांनी सूत्रसंचलन केले तर शेवटी सम्यका मुके हिने आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाला राज्यभरातून आलेले स्पर्धक व त्यांचे पालक तसेच सर्व प्राध्यापक बंधुभगिनी व विद्यार्थी आणि बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सिद्धेश्वर बाड, उमाकांत सलगर , प्रसन्न कंदले, संतोष चौधरी, दिलीप चव्हाण व सुमित चौधरी यांनी सहकार्य केले.