इटकळ / प्रतिनिधी :- (दिनेश सलगरे)
तुळजापूर तालुक्यातील मौजे येवती येथे रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री. लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी मौजे येवती येथे श्री.लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला असुन श्री. संत एकनाथ महाराज लिखित श्री.भावार्थ रामायणाचे हे तिसरे वर्ष होते रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रंथ वाचन व निरुपणास सुरुवात करण्यात आली. तब्बल बारा तास हा सोहळा सुरू होता श्री. भावार्थ रामायणातील युद्धकांडातील अध्याय क्रमांक ४३ ते ४९ असे सात अध्याय ओव्या ११३५ याचे रात्रभर वाचन व निरूपण करण्यात आले.या लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्यास परिसरातील तुळजापुर,उमरगा,कळंब,लातूर,सोलापूर,मोहोळ,पंढरपूर,मंगळवेढा ,परंडा ,बार्शी , औसा, अक्कलकोट आदि तालुक्यातील ग्रंथ वाचक व सूचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सुरू केलेले ग्रंथ वाचन निरूपण सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता श्री लक्ष्मण सावचित्य झाल्या नंतर लक्ष्मण शक्ती सोहळ्याची सांगता करण्यात आली. जय श्रीराम जय श्रीराम च्या जय घोषाने येवती गाव राम मय झाले. येवती येथील श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा हा न भूतो न भविष्यती असाच झाला जवळपास हजारो रामभक्त श्रीराम कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित होते. सकाळी महाआरती नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. अगदी नियोजन बद्द श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा संपन्न झाल्याने गाव परिसरातून येवती रामभक्त ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे.