spot_img
19.8 C
New York
Saturday, September 13, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

केमवाडी येथील डॉ.दिपक सुखदेव काळे यांच्या “कडकनाथ कुक्कुट” प्रजातीवर केलेल्या प्रबंधास प्रथम पारितोषिक प्रदान 

 

 

काटी/ प्रतिनिधी :- ( उमाजी गायकवाड )

तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील रहिवासी तथा सध्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक तथा विभाग प्रमुख पशुआनुवंशिक व पैदास शास्त्र विभाग नागपूर येथे कार्यरत असलेले डॉ. दिपक सुखदेव काळे यांना नुकताच त्यांनी पदवीत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शित केलेल्या “चिकन ग्रोथ हार्मोन आणि पेरिलिपिन जीन्स मधील पॉलिमॉर्फिझन आणि त्यांचा कडकनाथ कोंबडी मधील वाढ व मांस वैशिष्ट्यांशी संबंध” या कडकनाथ कुक्कुट प्रजावर केलेल्या प्रबंधास फॅकल्टी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

 

सोसायटी फॉर कॉन्झव्हिशन ऑफ डोमेस्टिक ॲनिमल जैवविविधता सोसायटीचे 22 वे “वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय परिसंवाद परिषद” पशुवैद्यकीय महाविद्यालय, पशुवैद्यकीय पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ हेब्बल बेंगळुरू, कर्नाटक नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात पशू विज्ञान केंद्राचे उपसंचालक डॉ.राघवेंद्र भट्ट, डॉ. बी.पी.मिस्त्रा, (हरियाणा), यांच्या हस्ते डॉ. दिपक काळे यांना प्रमाण पत्र, स्मृती चिन्ह देऊन राष्ट्रीय परिसंवाद परिषद, बेंगळुरू येथे गौरविण्यात आले. डॉ.दिपक काळे हे केमवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक कै. सुखदेव काळे यांचे धाकटे चिरंजीव आहेत.

 

या पुरस्काराबद्दल डॉ. दिपक काळे यांचे पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान क्षेत्रात तथा तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या