मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ येथील सचिन दशरथ बिरुणगी यांची लहुजी शक्ती सेना मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
युवकांचे प्रेरणास्थान सचिन बिरूणगी हे मंगळवेढा तालुक्यातील अनेक सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात. युवक, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या आडीआडचणी यासह तालुक्यातील अनेक कुटुंबीयांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात ते अग्रेसर असतात त्यांच्या एकंदरीत कार्याची दखल घेऊन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू (भाऊ) कसबे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव (भाऊ) भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष वसंत (भाऊ) देडे, युवक अध्यक्ष सोमनाथ कसबे यांनी सचिन बिरुणगी यांची लहुजी शक्ती सेना मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी एका नियुक्तीपत्राद्वारे निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व मित्रपरिवारांनी अभिनंदन केले आहे.