जळकोट, / प्रतिनिधी :- दि.१५(मेघराज किलजे)
श्री कुलस्वामिनी प्राथमिक,माध्यमिक आश्रमशाळा व राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा प्राचार्य संतोष चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापिका आशा पवार, नागेंद्र गुरव, खंडेराव कारले,संतोष दुधभाते , श्रीमती शांताबाई चौगुले,सुरेश कोकाटे,किरण ढोले, बाळासाहेब मुखम, बालाजी राठोड उपस्थित होते. यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पासाहेब साबळे यांनी केले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी संत सेवालाल महाराजा विषयी माहिती सांगितली.बंजारण गणवेशात आश्रमशाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्राथमिक , माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थिनीनी सुंदर बंजारा नृत्य सादर केले.श्री. बिळेणसिध्द हक्के,किरण कांबळे, अप्पासाहेब साबळे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील प्राचार्य,मुख्याध्यापिका,शिक्षक अभिजीत चव्हाण ,श्रीमती कल्पना लवंद, प्रमिला कुचंगे, अश्विनी लबडे, कु.
मयुरी कांबळे, सागर चव्हाण अमित खारे व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रिकरण दुर्गेश कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कांबळे तर आभार बिळेणसिध्द हक्के यांनी मानले.